मंगळवेढा प्रतिनिधी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जकाप्पा क्षीरसागर
यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज रात्री 8.30 वाजता आळंदी येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प सुनिताताई आंधळे यांचा कीर्तन व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प सुनिताताई आंधळे यांनी समाज प्रबोधन व्यसनमुक्ती हुंडाबळी समाजसेवा व आई-वडिलांची सेवा यातून महाराष्ट्रभर किर्तन व भजना मधून उपदेश दिला आहे तरी हुन्नूर व परिसरातील सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संतोष दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे सोमवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा पर्यंत भोसे येथील ह.भ.प. काटकर महाराज यांचा कीर्तन भजनाचा कार्यक्रम असून दुपारी बारा वाजता कै.दत्तात्रय जकाप्पा क्षीरसागर यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली फुलाचा कार्यक्रम असून पुष्पांजली कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संतोष दत्तात्रय क्षीरसागर यांनी केली आहे