शासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दावल इनामदार यांची निवड.... - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, January 6, 2021

शासनमान्य मंगळवेढा शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दावल इनामदार यांची निवड....


 मंगळवेढा / प्रतिनिधी

मंगळवेढा  शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी  दावल इनामदार(दै.सकाळ)  यांची तर सचिवपदी गणेश जाधव यांची निवड करण्यात आली.

सुरूवातीस पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नगरपालिका वाचनालय सभागृह मध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून विशेष सभेत निवडी करण्यात आल्या. संघाचे ज्येष्ठ पत्रकार संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली  नूतन अध्यक्ष दावल

इनामदार यांची बहुमताने निवड करण्यात आली त्यांना सर्वांची संमती दर्शवली तसेच उपाध्यक्षपदी खजिनदार संदीप लिगाड़े,सल्लागारपदी दत्तात्रय संदेलू  यांची निवड करण्यात आली .

यावेळी मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक ,सामाजिक  व इतर काही गरजेच्या वस्तूची मदत   करणार असून यावर्षी शहरातील एम फिल झालेल्या  तरुणाने 

अध्यापनाची नोकरी सोडून ग्रामीण रूग्णालय समोर

इंडिया झेरॉक्स नावाने व्यवसाय करीत असून कुटुंबाची उपजीवीका करीत आहे. त्यांना निकडीची  गरज ओळखून  संचालक निसार शेख यास व्यवसायास लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सचिन हेंबाडे,गणेश जाधव, संतोष पारसे,  लखन भगत, अजय वाघेला, वैभव बिले,दत्तात्रय संदेलु आदी उपस्थित होते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस ठाणे ,राष्ट्रवादी काँग्रेस 

पक्षातर्फे पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.

Pages