राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत इच्छा मरणास परवानगी दयावी यशवंत पवार यांनी राज्यपाल यांच्याकडे केली मागणी - Pantnagari Times

Breaking News

Friday, January 1, 2021

राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत इच्छा मरणास परवानगी दयावी यशवंत पवार यांनी राज्यपाल यांच्याकडे केली मागणी


 

सोलापूर / प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेली अनेक वर्षापासून पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ना शासकीय जाहिराती मिळणे

पक्की व स्वतः च्या मालकीचे घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना अल्प मानधनावर काम करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील  असा  भेदभाव न करता  केंद्र सरकार व राज्य सरकार च्या योजनेचा लाभ मिळणे  पत्रकारांवरील हल्ले बाबत जलद गती न्यायालयात खटले चालवणे कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना तात्काळ पन्नास लाख रुपये मदत करणे यासह पत्रकारांच्या विविध प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यसरकार ला जाग आणण्यासाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण निवेदन व वारंवार पत्रव्यवहार करून देखील राज्य सरकार ने पत्रकारांचे प्रश्न सोडवले नाहीत.


मूठभर पत्रकारांना खूष करण्यासाठी शेकडो पत्रकारांना राज्य सरकार ने वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केला असून राज्य सरकार ला पत्रकारांच्या प्रश्नाचा विसर पडल्याने मी जगून उपयोग तरी काय? असा प्रश्न हताश व निराश होऊन  राज्य सरकार ला विचारला आहे 

सहा  जानेवारी पत्रकार दिनी मला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे राज्यपाल यांना पत्राद्वारे केली आहे.

सदरचे निवेदन सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना दिले आहे

यावेळी वैजिनाथ बिराजदार अक्षय बबलाद अरुण सिदगिड्डी, इस्माईल शेख इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

Pages