आ.भारत भालके यांच्या त्या अखेरच्या शिफारशीने मुस्लिम समाजाच्या विकास कामास 20 लाखांचा निधी मंजूर:फिरोज मुलाणी - Pantnagari Times

Breaking News

Monday, January 25, 2021

आ.भारत भालके यांच्या त्या अखेरच्या शिफारशीने मुस्लिम समाजाच्या विकास कामास 20 लाखांचा निधी मंजूर:फिरोज मुलाणी


 मंगळवेढा / प्रतिनिधी

दिवंगत आ.भारत भालके यांच्या प्रयत्नाने  मंगळवेढा शहरातील शाही जामा मस्जिद येथे स्वछता गृह व पायाभूत सुविधा करणे व मुलाणी समाजाच्या सामाजिक सभागृहवर खोली बांधण्यासाठी 20 लाख निधी मंजूर करण्यात आल्याची जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांनी दिली.

राज्य शासनाच्या महानगरोत्थान अभियान अंतर्गत किल्ला भागातील शाही जामा मस्जिद येथे पायाभूत सुविधा करणेसाठी 11लाख तर मुलाणी गल्ली येथे सामाजिक सभागृहवर पहिल्या मजल्यावर खोली बांधणेसाठी 9 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. आ.भारत भालके यांनी दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी या कामांना अग्रक्रमाने मंजूर करावा म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना शिफारस केली होती. त्या अनुषंगाने याच शिफारशीतील मुलाणी समाज कब्रस्तान येथे 7 लाखाचे पेव्हींग ब्लाॅक बसविणे करिता मंजूर करण्यात आले आहेत.उर्वरित दोन्ही विकास कामांना आता 20 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवंगत आ.भारत भालके यांनी त्यांच्या ह्यातीत मुस्लिम समाजाच्या या विकास कामासाठी अखेरची शिफारस केली होती.

शाही जामा मस्जिद येथे स्वच्छतागृह व पायाभूत सुविधा करणे व सामाजिक सभागृहवर पहिल्या मजल्यावर खोली बांधकाम झाल्या नंतर मुस्लिम समाजाच्या नागरिकांना धार्मिक, सार्वजनिक व स्वच्छता करिता उपयोगी पडणार आहे.मुस्लिम समाजाच्या विकास कामासाठी जिल्हा नगरविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.पंकज जावळे,नगराध्यक्षा अरूणा माळी,मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव व सर्व नगरसेवक यांचे सहकार्य लाभले आहे.

---‐------------------------

मुस्लिम समाजाच्य एकूण 30 लाखांच्या या विकास कामांचे प्रस्ताव मंजूरी व निधी अभावी प्रलंबित रहावेत.सदर विकास काम होऊ नये म्हणून नगरपरिषद बांधकाम विभाग कडील विकृत विचाराच्या एका कर्मचा-याने दडवून ठेवले होते.सदर प्रकार माझ्या निदर्शनास आल्याने तात्काळ आ.भारत भालके व मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर आ.भारत भालके यांनी तात्काळ सदर कामाबाबत शिफारस पत्र अग्रक्रमाने मंजूर करावेत म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले.आणि मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांना तात्काळ सदर प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.आज या विकास कामांना निधी मंजूर झाल्याने दिवंगत आ.भारत भालके यांच्यामुळे मुस्लिम समाजाला न्याय मिळाला आहे.

- फिरोज मुलाणी, 

जिल्हा सरचिटणीस, 

जिल्हा काँग्रेस कमिटी,सोलापूर

Pages