लोखोंचा महसूल बुडविणा-या त्या जलसंपदा अधिका-यांवर दोषारोपपत्र आता प्राधिकरणाच्या कारवाईच्या भूमीकेकडे लक्ष - संदिप मुटकुळे - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 17, 2020

लोखोंचा महसूल बुडविणा-या त्या जलसंपदा अधिका-यांवर दोषारोपपत्र आता प्राधिकरणाच्या कारवाईच्या भूमीकेकडे लक्ष - संदिप मुटकुळे


 

पंढरपूर - प्रतिनिधी

शिवस्वराज्य युवा संघटनेने दणका देताच सरकारी मुरुमांचा घपला करणाऱ्या 'त्या' जलसंपदा अधिकाऱ्यांवर दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून आता प्राधिकरण कार्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.उजनी कालवा उपविभाग क्रमांक ५२ मंगळवेढा या करायलाच उप विभागीय अधिकारी शिवाजी चव्हाण यांच्याबाबत शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी गंभीर तक्रार केली होती.जलसंपदा विभागाच्या जमिनीतील लाखो रुपयांचा मुरूम दिवसाढवळ्या एका ठेकेदाराने उचलून नेला पण या अधिकाऱ्याने मौन बाळगणे पसंत केले. लाखो रुपयांचा सरकारी महसूल बुडाला असून अधिकाऱ्याच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी केला होता तसेच या भ्रष्टचाराची चौकशी करण्याची लेखी मागणी मुख्यमंत्र्यांपासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वांकडे केली होती.तक्रार करून दोन महिने झाले तरी या तक्रारींचे काय झाले हे समजू शकल्याने शिवस्वराज्य संघटनेने पुन्हा तक्रार करीत, उपोषणाचा इशारा देत माहिती मागितली होती, त्यानंतर भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी या कारवाईची माहिती मुटकुळे याना दिली आहे.उपविभागीय अधिकारी शिवाजी लक्ष्मण चव्हाण यांनी विभागीय कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता मुरुमाची अवैध वाहतूक करून लाखो रुपयांचा महसूल बुडविल्याने त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा नियम क्रमांक ३ चा भंग केला आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम - १० बाबतचे प्रारूप दोषारोपपत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आल्याची माहिती भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.विभागीय कार्यालयाने प्राधिकरण कार्यालयाकडे प्रारूप दोषारोपपत्र सादर केल्याने आता प्राधिकरण कार्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे, प्राधिकरण कार्यालयाची भूमिका शंकास्पद वाटत असून या कार्यालयाने निर्णय घेण्यास विलंब केल्यास आंदोलन छेडण्यात येणार आहे असे शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी सांगितले. 

Pages