संखमधील श्री संत बागडेबाबा आश्रमात सिध्देश्वर महास्वामीजी यांचे बुधवारी प्रवचन ह.भ.प तुकाराम बाबा - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, December 15, 2020

संखमधील श्री संत बागडेबाबा आश्रमात सिध्देश्वर महास्वामीजी यांचे बुधवारी प्रवचन ह.भ.प तुकाराम बाबा

 

जत / प्रतिनिधी

--------------------

जत तालुक्यातील संख येथे श्री संत बागडेबाबा आश्रमात विजापूर येथील ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण तसेच प्रवचनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.

गुड्डापूर संख रस्त्यावरील श्री संत  बागडेबाबा आश्रमात बुधवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रयत्नातुन, भाविकांच्या सहकार्याने श्री संत बागडेबाबा आश्रम येथे श्रीसंत बागडेबाबा यांचे भव्य मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात  आहे. त्या मंदिराची पाहणी ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपन करण्यात येणार आहे. वृक्षारोपनानंतर मंदिर परिवारात उभारण्यात आलेल्या सयाजी बाबा बिसलरी प्लॅन्टचे उदघाटन  शिवयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे.मठात सुरु असलेल्या उद्योगाची पाहणी 

करणार आहेत. या कार्यक्रमास बालगाव येथील गुरुदेव आश्रमचे डॉ अमृतानंद महास्वामीजी, इचलकरंजी गुरुदेव आश्रमाचे महेशानंद स्वामीजी उपस्थित राहणार आहेत.तरी भाविक भक्तानी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन मठाधिपती ह.भ.प तुकारामबाबा महाराज यांनी केले आहे.

■ बाबा जल चा शुभारंभ

ज्ञानयोगी परमपूज्य सिध्देश्वर महास्वामीजी  यांच्या हस्ते बाबा आश्रमात उभारण्यात आलेल्या बाबा जल चा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Pages