भारतनानांची उणीव भासली, पण नानांचे वस्ताद आले आणि दिले शुभ आशीर्वाद!' - Pantnagari Times

Breaking News

Friday, December 18, 2020

भारतनानांची उणीव भासली, पण नानांचे वस्ताद आले आणि दिले शुभ आशीर्वाद!'


 

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारत भालके (bharat bhalke) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा नियोजित दौरा पंढरपुरात सुरू आहे. यादरम्यान त्यांचा पंढरपूर येथून स्वर्गीय भालके यांच्या सरकोली या गावी जाण्यासाठी ताफा निघालेला असतानाच तो थांबवून त्यांनी नवविवाहित वधूवरांना शुभ आशीर्वाद दिला. हा किस्सा सध्या पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा बनला आहे. 

गादेगाव (ता. पंढरपूर) येथील सुरज नवनाथ शिंदे व उरळी कांचन (पुणे) येथील काजल हरी क्षिरसागर यांचा कालच (दि. १७ डिसेंबर रोजी) गादेगाव येथे विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे हे नवदांपत्य ग्रामदैवत दर्शनाला जात होते. भक्तिमार्गावर हे दांपत्य दिसल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला ताफा उभा करून नव वधू-वरांना शुभ अशिर्वाद दिले. त्यानंतर ते आपल्या नियोजित दौऱ्याकडे मार्गस्थ झाले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते. 

खऱ्या देवाचे दर्शन झाले 

कालच माझा विवाह सोहळा गादेगाव येथे संपन्न झाला. यामध्ये अनेक मान्यवर मित्रमंडळी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले होते. परंतु स्वर्गीय नानांची या सोहळ्यामध्ये उणीव भासली. परंतु स्वर्गीय नानांचा वस्ताद आज शुभाशीर्वाद देऊन गेले. त्यामुळे आज ग्रामदैवताच्या दर्शनाबरोबरच खऱ्या देवाचे दर्शन झाली, अशी भावना नवरदेव सुरज शिंदे यांनी व्यक्त केली

Pages