नंदेश्वरच्या माजी सरपंच कोंडाबाई कांबळे यांच्या उमेदवारी अर्जामुळे विरोधकांनी घेतला धसका - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, December 30, 2020

नंदेश्वरच्या माजी सरपंच कोंडाबाई कांबळे यांच्या उमेदवारी अर्जामुळे विरोधकांनी घेतला धसका


 नंदेश्वर / प्रतिनिधी

नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथील पॅनेल प्रमुख माजी उपसभापती दादासाहेब गरंडे यांच्या गटातून प्रभाग क्रमांक पाच मधून माजी सरपंच कोंडाबाई कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून सोबत रेखा सुनील कसबे, अर्चना दाजी गरंडे, यांनीही  आपला अर्ज दाखल केला असून एकदम अंतिम क्षणी माजी सरपंच कोंडाबाई कांबळे यांच्या अर्जामुळे विरोधकांनी धसका घेतल्याचे बोलले जात आहे

   कोंडाबाई मसू कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सन 2000 साली नंदेश्वर गावची प्रथम नागरिक सरपंच झाल्या कुठलेही कामात राजकारण न करता जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून विकास कामे केली. मी केलेल्या कामाची पोहोच म्हणून व 2005 ते 2015 पर्यंत पुतण्या उपसरपंच झाला व 2015 ते 2020 सून ग्रामपंचायत सदस्या असे वीस वर्ष चांगले राजकारण केल्यामुळेच आमच्या कुटुंबातील सदस्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितलेगोरगरीब जनतेच्या आग्रहाखातर पुन्हा मला काम करण्याची संधी मिळावी म्हणून प्रभाग क्रमांक पाच मधून मागासवर्गीय जागेतून माझी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आत्तापर्यंत केलेल्या जनतेच्या विकास कामातून माझा विजय निश्चित आहे आणि जनताच मला पोचपावती देणार असल्याची माजी सरपंच कोंडाबाई मसू कांबळे यांनी सांगितले

Pages