शरद पवारांचा शब्द ठरला महत्त्वाचा, दिवंगत भारत भालके यांच्या सुपुत्राची बिनविरोध निवड - Pantnagari Times

Breaking News

Monday, December 21, 2020

शरद पवारांचा शब्द ठरला महत्त्वाचा, दिवंगत भारत भालके यांच्या सुपुत्राची बिनविरोध निवड


 पंढरपूर / प्रतिनिधी

 राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके (NCP MLA Bharat Bhalake) यांच्या निधनामुळे पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद (Pandharpur vitthal co operative sugar factory chairman) रिक्त झालं होतं. आता चेअरमनपदी भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके (Bhagirath Bhalake) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भगिरथ भालके यांच्या बिनविरोध निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा शब्द महत्त्वाचा ठरला. विठ्ठल परिवार एकत्र ठेवण्याची गरज शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं बहुमतानं भगिरथ भालके यांची निवड करून दिवंगत भारत भालके यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

साह्ययक निंबळक एम. एस. तांदळे यांच्या अध्यक्षेतेखाली चेअरमनपदी भगिरथ भालके यांची बिनविरोध निवड झाली. सगळ्यांनी साथ दिल्यानं भगिरथ भालके यांच्या रुपात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सर्वात तरुण चेअरमन मिळाला आहे.

काय म्हणाले शरद पवार...?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधनानंतर दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सरकोली या गावी येऊन भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं होतं.

आमदार भालके यांना पाणी प्रश्न आणि सहकाराची जाण होती. त्या क्षेत्रातील त्यांचे काम विसरता येणार नाही. विठ्ठल साखर कारखाना सुरू करण्यासाठी त्यांची धडपड होती. यामुळे त्यांचे आजाराकडे दुर्लक्ष झाले. आज भालके आपल्यात नाहीत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या स्थितीवर सुद्धा शरद पवारांनी बोट ठेवलं. दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने काम करणाऱ्या सर्वच नेत्यांना यापुढे एकत्र काम करणयाचे आवाहन केलं. जुन्या सहकाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी पवार सरसावले आहेत.

Pages