विठ्ठल कारखान्याचे नूतन चेअरमन भगीरथ भालके खा. शरद पवारांच्या भेटीला - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 24, 2020

विठ्ठल कारखान्याचे नूतन चेअरमन भगीरथ भालके खा. शरद पवारांच्या भेटीला


 पंढरपूर / प्रतिनिधी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आज राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

आम.भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीत खा. शरद पवार यांचा मोठी भूमिका असल्याचे निष्पन्न झाले आहे. नुकतेच खा. पवारांनी सरकोली येथे सांत्वन दौऱ्यावर येऊन आपले विठ्ठल परिवारावर लक्ष असेल अशी ग्वाही दिली होती.

त्यानंतर त्यांच्याच सूचनेनुसार विठ्ठल च्या चेअरमनपदाची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज ( बुधवारी ) सकाळी भगीरथ भालके यांनी खा. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच यावेळी कारखान्याच्या गाळप हंगामाविषयी चर्चा केली. 

यावेळी विठ्ठल कारखाना चे व्हॉ.चेअरमन लक्ष्मण (आबा) पवार, जेष्ठ संचालक मोहन कोळेकर व अधिकारी वर्ग उपस्थित होते…

Pages