निर्भिड पत्रकार चाँदभैया शेख यांनी ...माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती - पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदाचा दिला राजीनामा.. - Pantnagari Times

Breaking News

Friday, December 4, 2020

निर्भिड पत्रकार चाँदभैया शेख यांनी ...माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती - पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदाचा दिला राजीनामा..


 पत्रकारांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या राजकीय नेत्यांचा केला जाहीर निषेध....


सांगोला / प्रतिनिधी

लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड  व आपल्या धारदार लेखनीने व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य , तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे ,कमी कालावधीतच गरुडझेप घेणाऱ्या CBS NEWS नेटवर्कचे संपादक व निर्भीड पत्रकार चाँदभैया शेख यांची निर्भीडता पुन्हा एखादा समोर आली आहे . ती अशी कि  नॅशनल सोशलिस्ट पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्षांने पत्रकारांच्या बदल बेताल वक्तव्य केले होते या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदा त्याग केला आहे .कारण या पार्टी च्या अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती काम करीत होती .त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे .

 मंगळवार दि.2 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा दिला आहे.सदर राजीनामा संदर्भात आमचे विशेष प्रतिनिधी यांनी  चाँदभैया शेख यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी आपले स्पष्टीकरण देताना म्हणाले कि पत्रकार हा समाजासाठी सत्याचा आरसा समजला जातो. लोकांचा प्रचंड विश्वास असणारं प्रतिभावंत व प्रामाणिक उदाहरण म्हणून पत्रकारीतेकडं पाहिलं जातं. पत्रकारिता अवगत करण्यासाठी लेखणीची तलावार व शब्दांची ढाल करुन अन्यायाच्या विरोधत लढण्यासाठी सदैव सज्ज असतो तो पत्रकार. भल्याभल्यांना आपल्या शब्दांनी व परखड लेखणीच्या माध्यमातून चारीमुंडयाचित करीत असतो मात्र काही राजकीय नेतेमंडळी कडून वारंवार पत्रकारांना बदनाम करण्याचे काम नेते मंडळी करीत असतात या एका हि राजकीय नेत्यांने पत्रकारांच्या बदल अपशब्द वापरला तर याद राखा तुमच्या भाषेत उत्तर दिले जाईल .येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकारांना एकत्र करून पत्रकारांच्या हितासाठी मोठा लढा उभारला जाईल असे प्रतिपादन चाँदभैय्या शेख यांनी केले आहे .पुढे बोलताना चाँदभैय्या शेख म्हणाले कि आमची पत्रकारिता कोणत्याही राजकीय पक्षाची गुलामगिरी कधीच करणार नाही .इथून पुढे कोणत्याहि राजकीय पक्षातील नेत्यांनी  पत्रकारिता कडे वाकडी नजर करुन पाहिले तर  त्यांना त्यांची जागा लेखणीच्या धारदार शस्त्रातून दाखवली जाईल असे स्पष्टीकरण चाँदभैया शेख यांनी दिले आहे विशेषतः यांच्या या निर्णयामुळे चाँदभैय्या शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Pages