मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील श्री दत्त आश्रम हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील मठाला विकास निधीसाठी पाठपुरवठा असे व्यंकट भालके यांनी संगितले.दत्त जयंती निमित्त सप्ताहाला भेट दिली असता ते बोलत होते
यावेळी मठाचे मठाधिपती ह भ प होनमोरे बाबा, रावसाहेब फाटे, बसवराज पाटील, शाहीर यशवंत खताळ महाराज ,सरपंच मच्छिंद्र खताळ, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे, माजी सरपंच यशवंत होळकर, माजी उपसरपंच राजाराम पुजारी,ह.भ.प ज्ञानदेव घाडगे ह.भ.प पवनकुमार होनमोरे हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
हुन्नुर येथील दत्त आश्रम मध्ये जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते या आश्रम मध्ये वर्षा मधून दोन वेळा मोठा सप्ताह भरला जातो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी साधुसंतांचे किर्तन भजन प्रवचन चा कार्यक्रम असतो
दत्त जयंती निमित्त होनमोरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन जयंतीचा उत्सव पार पडला यावेळी भाविक भक्तांना महाप्रसाद वाटण्यात आला
या जयंती उत्साह मध्ये ह.भ.प होनमोरे बाबा शाहीर यशवंत खताळ महाराज. ह.भ.प व सरपंच मच्छिंद्र खताळ यांचे कीर्तन व भजन झाले