पंढरपूर / प्रतिनिधी
स्व.आमदार भारत(नाना)भालके यांचे अकाली निधन झाले त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्र फडणवीस यांनी भगीरथ(दादा)भारत भालके ,चेअरमन, विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले या वेळी माजी जि. प .सदस्य व्यंकट(आण्णा)भालके व इतर सदस्य उपस्थित होते.
भालके यांनी मतदार संघासाठी नेहमीच विधानसभेत सरकारला धारेवर धरले.फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा ही आ.भारत भालके विधानसभेत त्याना चांगलेच धारेवर धरायचे मात्र तरीही त्याचे व्यक्तिगत संबंध हे चांगले होते.
विधानसभेत भालके यांच्या कार्याचा आढावा घेत फडणवीस यांनी खंत व्यक्त केली होती.सामान्य माणसासोबत असणारे भालके यांचे संबंध आणि ग्रामीण भागातील रागडी भाषा यामुळे नेतेमंडळीत त्याची मोठी वाढती क्रेज होती.