सोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 24, 2020

सोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास


 सोलापूर / प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील वैराग येथील विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या सोने चांदीच्या दुकानावर बुधवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात पंधरा हजाराच्या रोख रकमेसह सुमारे सहा ते सात लाख रुपयांची चांदी लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या दरोड्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण सुधाकर व उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपासाकरिता श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले आहेत. यापुर्वी २००८ विनय चंद्रकांत गोवर्धन यांच्या व उदय गोवर्धन यांच्या दुकानावर दिवसा सहा वाजता दरोडा टाकून सुमारे पाच कोटींचे सोने व चांदीचे दागिने लुटले होते. परत गतवर्षी देखील येथेच चोरी झाली होती.

Pages