अकलूजच्या सिंहानेच केली शेवटी बिबट्याची शिकार - Pantnagari Times

Breaking News

Friday, December 18, 2020

अकलूजच्या सिंहानेच केली शेवटी बिबट्याची शिकार


 सोलापूर - प्रतिनिधी

 गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश मिळाले आहे. शुक्रवारी सायंकाळी धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडून बिबट्याला जागीच खलास केले.


यानंतर हे वृत्त कळताच दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांंनी नि:श्वास सोडला.या बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात तीन नरबळी घेतले होते. करमाळा तालुक्यातील वांगी नं. ४ राखुंडे वस्तीवर पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्या आला होता. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे बारामतीचे तावरे यांच्यासमवेत या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.

वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहिते-पाटील यांनी १५ फुटावरून नरभक्षक बिबट्यावर बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडल्या आणि बिबट्याला ठार केले.

Pages