शिवस्वराज्य युवा संघटनेला सरपंच सेवा संघटनेच्या वतीने शिर्डी येथे सामाजिक युवारत्न पुरस्कार जाहीर - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 24, 2020

शिवस्वराज्य युवा संघटनेला सरपंच सेवा संघटनेच्या वतीने शिर्डी येथे सामाजिक युवारत्न पुरस्कार जाहीर


 

पंढरपूर / प्रतिनिधी

सरपंच सेवा संघाच्या वतीने शिर्डी येथे विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण सोहळा राज्यापाल भगतसिंग कोशारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ह.भ.प.इंदूरीकर महाराज व आजी माजी आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये 6जानेवारीला शिर्डी येथे सोहळा संपन्न होणार आहे. सरपंच सेवा संघाच्या वतीने या वर्षीचा राज्यस्तरीय सामाजिक युवारत्न पुरस्कार शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांना जाहीर झाला आहे. शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेने ब-याच दिवसापासून समाजसेवा सामाजिक कार्य करत आहोत.  शिवस्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब,शेतकरी, कष्टकरी,मजूर,हातवर काम करणा-या महिलांना प्रथम प्राधान्य देवून काम केले जाते.विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि युवकांचे अनेक प्रश्न सोडवत ही शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्यभर कार्य करत आहे.

शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य कोणाच्याही मदतीला धावून जाते.शिवस्वराज्य युवा संघटनेचा प्रवास तसा खडतरच आहे. शिवस्वराज्य युवा संघटना अनेक संकटांना तोंड देऊन सामान्य जनतेला व बाराबलूतेदारांना केंद्र बिंदू मानून जनतेची सेवा करत आहे.ही संघटना कधीही सामाजिक कार्य थांबवले नाही सतत सामान्य जनतेला न्याय मिळून देण्यासाठी काम करत आहे.कोरोना काळामध्ये देखील शिवस्वराज्य युवा संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व पोलिस प्रसशान,पत्रकार, 

डाॅक्टर,नर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर सेविका यांना एक महिना भाजीपाला व किरणा किट,मोफत वाट केले आहे.आणि कोरोना कोडिव योद्धा गौरव सन्मानपत्र म्हणून तब्बल 25पुरस्कार शिवस्वराज्य युवा संघटनेला भेटले आहेत.संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी लहान पणापासून समाजसेवेची आवड असल्यामुळे आणि युवकांना चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करत आहेत. खूप लहान वयात चांगल्याप्रकारे सामाजिक कार्य व कामगिरी केल्याबद्दल सरपंच सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे व युवक नेते नितीन काळे यांनी सरपंच सेवा संघटनेचा सामाजिक युवारत्न पुरस्कार जाहीर केला आहे.  हा पुरस्कार राज्यस्तरीय असून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी खूप लहानपणापासून समाजसेवा आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपून कार्य करायची अवड असल्यामुळे एक नवा आदर्श युवकासमोर निर्माण केला. शिवस्वराज्य युवा संघटनेच्या कार्याचा पुढील युवकांनी आदर्श घेवून सामाजिक कार्य करावे.शिवस्वराज्य युवा संघटनेच्या कामाची पोचपावती म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडीतरी सेवा केलेली मिळाली.हा पुरस्कार मला नसून ज्यांनी शिवस्वराज्य युवा संघटनेचे महाराष्ट्रभर चांगले कार्य केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले हा त्यांचा पुरस्कार आहे.असे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी सांगितले.पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्रातील व सर्व जिल्हातील आणि तालुक्यातील सर्वानी उपस्थित राहावे.असे त्यांनी सांगितले त्यांच्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल शिवस्वराज्य युवा संघटनेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना पुढील कार्यास सर्वजणं शुभेच्छा देत आहेत..

Pages