मंगळवेढा / प्रतिनिधी
स्वप्नपूर्ती सकल अपंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बावी(आ) तालुका बार्शी यांच्या वतीने ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिना निमित्त समाधान हेंबाडे यांचा 'दिव्यांग मित्र' म्हणून शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले.समाधान हेंबाडे हे सद्या राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना मंगळवेढा तालुकाअध्यक्ष पदावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प. सदस्य समाधान बाप्पा डोईफोडे, प्रमुख पाहुणे सरपंच सोनल आगलावे, अपंग चित्रकार महेश म्हस्के, शांतीलाल काशीद यांच्या हस्ते अपंग मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी उपस्थित अपंग बांधवाना तांदूळ वाटप करण्यात आले.
तसेच या कार्यक्रम प्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धराया माळी, बार्शी तालुका तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके,स्वप्नपूर्ती अपंग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू आगलावे, उपाध्यक्ष नागनाथ उंबरे, सचिव कविता करडे, सहसचिव विठ्ठल आगलावे,मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब घोडके, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, परशुराम उंबरे, प्रफुल पाटील, निलेश म्हमाणे, कैलास करडे आणि दिव्यांग बांधव,गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.