मंगळवेढा / प्रतिनिधी
आ.भारत भालके यांच्या प्रयत्नाने मंगळवेढा शहरातील मुलाणी समाजाच्या सार्वजनिक कब्रस्तान मध्ये पेव्हींग ब्लाॅक बसविणे करिता 7 लाख 32 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस व मुलाणी समाज दर्गाह व कब्रस्तान वक्फचे अध्यक्ष फिरोज मुलाणी यांनी दिली.
राज्य शासनाच्या नगर विकास विभाग कडील विकास योजने अंतर्गत मुलाणी समाज सार्वजनिक कब्रस्तान मध्ये निधी मंजूर करण्यात आला आहे.सदर निधी मंजूर करणेबाबत दि.28 ऑगस्ट 2020 रोजी आ.भारत भालके यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना शिफारस केली होती.त्याअनुषंगाने जिल्हा नगर विकास विभागाचे प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निधी मंजूरीचा प्रस्ताव सादर केला होता.त्याअनुषंगाने निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्व.आ.भारत भालके यांनी या विकास कामा बरोबर मंगळवेढा शहरातील सि.स.नं.4526 येथील शाही जामा मस्जिद येथे पायाभूत सुविधा करणेसाठी 11 लाख निधी व मुलाणी गल्ली सार्वजनिक सभागृह इमारत वर पहिला मजला बांधकाम करणे व इतर सार्वजनिक सुविधा करणेसाठी 9 लाख 35 हजार निधी मंजूर करणेबाबत शिफारस केलेली असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे कडून कार्यवाही सुरू आहे.मुस्लिम समाजाच्या विकास निधी करिता जिल्हा नगर विकास विभागाचे प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे,मंगळवेढा नगराध्यक्षा अरूणा माळी,मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव व सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभले आहे.
मंगळवेढा शहरात आ.भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाची आता पर्यत दोन कोटीची विकास कामे झालेली आहेत.आ.भारत भालके हयात असताना त्यांनी मुलाणी समाज कब्रस्तान व अन्य दोन अशी एकूण तीस लाखांची विकास कामे मंजूर होणेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे शिफारस केली होती.मुस्लिम समाजाच्या विकासासाठी केलेल्या आ.भारत भालके यांच्या योगदान बद्दल मुस्लिम समाज त्यांचे सदैव ऋणी राहील असे भावनात्मक उदगार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांनी व्यक्त केले.