हुन्नूर येथे गुरु बिरोबा- शिष्य महालिंगराया या दोन देवांचा पालखी भेट सोहळा पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात पार पडला - Pantnagari Times

Breaking News

Sunday, November 8, 2020

हुन्नूर येथे गुरु बिरोबा- शिष्य महालिंगराया या दोन देवांचा पालखी भेट सोहळा पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात पार पडला


 मंगळवेढा / प्रतिनिधी

----------------------------

         धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा व हलजंतीचे महालिंगराया या दोन गुरु शिष्याचा पालखी भेट सोहळा फक्त मोजक्या पुजारी मंडळ व ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या बंदोबसतात पार पडला.

या पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटकातून येतात पण कोरोना संसर्ग आजारामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती शेकडो वर्षाची परंपरा असल्यामुळे पोलीस प्रशासन व पुजारी मंडळ यांच्यात एक बैठक घेण्यात आली होती पालखी भेट सोहळा दरम्यान हुन्नूरचे पुजारी व हुलजंतीचे पुजारी प्रत्येकी 20 पुजारी थांबवण्यात आले होते सोशल डिस्टन्स चे पालन करत पालखी भेट सोहळा पार पडला भेट सोहळा उत्साहात पार पडण्यासाठी तहसीलदार स्वप्नील रावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंजवटे, ए.पी.आय. सत्यजित आवटे,पोलीस नाईक सुहास देशमुख, सरपंच मच्छिंद्र खताळ, धनगर समाजाचे नेते जगन्नाथ रेवे, देवस्थान कमिटी अध्यक्ष राजाराम पुजारी, सचिन शिंदे, सचिव शिवाजी पुजारी, ज्योतिबा पुजारी, ब्रह्मदेव रेवे, विशंभर पुजारी, रामराया पुजारी, हुआप्पा पुजारी, दत्ता पुजारी, जकाप्पा पुजारी, आप्पा पुजारी, व सर्व पोलिस प्रशासन व ग्रामस्थ यांनी केले

Pages