लक्ष्मी दहिवडीतील पोस्टात अधिका-यांचा मनमानी कारभार, कार्यालय वेळेवर उघडत नसल्याने नागरिकांची गैरसोय - Pantnagari Times

Breaking News

Saturday, November 7, 2020

लक्ष्मी दहिवडीतील पोस्टात अधिका-यांचा मनमानी कारभार, कार्यालय वेळेवर उघडत नसल्याने नागरिकांची गैरसोय


 

मंंगळवेढा - प्रतिनिधी 

पोस्ट ऑफिस मधुन नागरिकांना सेवा प्रदान करण्यासाठी आंतरदेशी पञे, पार्सल स्विकारणे, पोस्ट ऑफिस बॉक्स प्रदान करणे आणि टपाल तिकिटे, पॅकेजिंग अन्य सेवा देण्यासाठी पोस्ट ऑफिस भारत सरकारने गावोगावी सुरू केली आहे. माञ लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे पोस्ट ऑफिस वेळेवर उघडत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतुन जोरदार होत आहे.

   गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मी दहिवडी पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी वेळ वर पोस्ट ऑफिस उघड नाही. गावातील नागरिकांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता मी आज मंगळवेढा ऑफिस ला चाललो आहे तुमचं काय काम आहे असे विचारून सदर कर्मचारी नागरिकांना सेवा-सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. अनेक वेळा पोच रजिस्टर करण्यासाठी नागरिकांना गाव पोस्ट ऑफिस असताना सुद्धा मंगळवेढा येथील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर करावे लागले आहे. पोस्टाच्या विविध योजना यांचे फलक दर्शनी भागात लावले नसुन कार्यालय उघडण्याची वेळ पोस्ट ऑफिस मध्ये नसल्याने नागरिकांना तासोंतास पोस्ट ऑफिस उघडण्याची वाट पाहत बसावे लागते. याशिवाय गावातील नागरिकांना बचत आणि रिकरिंग खात्यांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, बचत योजना अशा सुविधा पोस्टातर्फे देण्यात येतात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस वेळेवरउघडत नसल्याने नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. 

   लक्ष्मी दहिवडी पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी हे वेळवर कार्यालय उघड नसुन कधी येणार आहे असे संपर्क साधुन असे विचारले असता उर्मट भाषेत नागरिकांना बोलत असल्याचे दबक्या आवाजात ग्रामस्थांतुन बोलले जात आहे. याशिवाय कार्यालय बाहेर कार्यालय उघडण्यात येणारी वेळ, माहिती अधिकार यांचे नाव व पदनाम यांचे फलक नसल्याने नागरिकांना खुप अडचण येत आहे. पोस्टाच्या सीनिअर सिटिझन स्कीममध्ये ठेव रकमेवरील व्याज थेट पोस्टाच्या किंवा बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याची सोय पोस्ट असुन नागरिकांना याचा लाभ घेण्यासाठी तासोंतास कार्यालया  समोर उभे राहावे लागते आहे. या शिवाय सदर काम हे तो अधिकारी एजंट मार्फत करत असल्याचे नागरिकांना बोलले जात आहे.

    पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना  पोस्ट ऑफिस बचत खाते (पोसा),  पंचवार्षिक पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते (आरडी), पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खाते (टीडी),  पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (एमआयएस),  वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस),  15 वर्षांचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (पीपीएफ),  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी),  किसान विकास पत्र (केव्हीपी), सुकन्या समृद्धि योजना आदी योजनेचे लाभ नागरिकांना मिळत नसल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त होत आहे.

   अशा मनमानी करणा-या पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांतुन जोरदार होत आहे.

Pages