मंगळवेढा / प्रतिनिधी
ऋतुजा नागनाथ जोध पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) राज्यात सातवी तर सोलापूर जिल्ह्यात दुसरी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षेत ऋतुजा नागनाथ जोध इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेचे विद्यार्थिनी हिने 274 गुण मिळवून राज्यात सातवी तर सोलापूर जिल्ह्यात दुसरी येण्याचा मान मिळवला आहे.
ऋतुजा च्या या यशाबद्दल मंगळवेढा विभागाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे मंगळवेढा तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी तसेच प्रांत कार्यालय मंगळवेढा व तहसिल कार्यालय मंगळवेढाचे सर्व अधिकारी व कर्मचारी इंग्लिश स्कूल मंगळवेढा संस्थेचे अध्यक्ष कदम इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मंगळवेढ्यातील रामा पार्क परिवाराचे सर्व सदस्य ऋतुजा चे आजी आजोबा मामा मामी काका मावशी आई बाबा मोठा भाऊ छोटा भाऊ तसेच भोसे गावातील सर्व ग्रामस्थ यांनी ऋतुजा चे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
ऋतुजा ही भोसे मंडलाधिकारी नागनाथ जोध साहेब यांची कन्या आहे. शासकीय विभागात वडिलांप्रमाणे मोठ्या पदावर काम करण्याचा तिचा मानस आहे.
ऋतुजा हीस इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील शिक्षक सतीश सावंत , व्ही डी माने , एस एम भोसले व इनामदार मॅडम यांचे तसेच शिवलिंग राऊत गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.