पंढरपूर - प्रतिनिधी
आमदार भारत भालके यांच्यावर पुणे येथे उपचार चालू आहेत. यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संदर्भात पसरलेल्या कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आ.भारत भालके यांचे पुतणे व्यंकट भालके यांनी केले आहे.
आ.भालके यांना ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर ते बरे झाले होते. मात्र मागील 8 दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळपासून त्यांच्या तब्येतीविषयी अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन व्यंकट भालके यांनी केले आहे.
या संदर्भात दिलेल्या संदेशात भालके पुढे म्हणाले की , नाना सुरू असलेल्या उपचारास उत्तम प्रतिसाद देत आहेत.
त्यामुळे ते लवकर बरे होऊन येतील , सकाळपासून सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, ते सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे, पांडुरंगाच्या कृपेने ते बरे होतील, असा विश्वासही व्यंकट भालके यांनी व्यक्त केला आहे.