मंगळवेढा / प्रतिनिधी
येथील हनुमान विद्यामंदीर प्रशालेच्या १५ विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवीत शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रशालेचा दबदबा कायम ठेवला. प्रशालेतील एका विद्यार्थ्यांने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती तर चौदा विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सत्तावन्न विद्यार्थी समाविष्ट झाले होते त्यापैकी ३७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. प्रशालेतील प्रतीक्षा दशरथ गणपाटील हिने मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण विभागात प्रथम तर जिल्ह्यात पंधरावा क्रमांक तर श्रुतिका श्रीकांत मेलगे हिने तालुक्यात तिसरा क्रमांक तर जिल्ह्यात चोपन्नाव्वा क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांबरोबर साक्षी दशरथ गणपाटील, ऋतुजा सोमनाथ पोतदार, प्रतिक्षा दादासो कुंभार, प्रणिता पोपट गाडवे, पूजा राजेंद्र बंदाई, साक्षी प्रकाश शिंदे, ऋतुजा राजेंद्र जाधव, यशराज सिताराम पवार, रोहीत प्रकाश टोमके, रोहन बापू जाधव, रोहीत प्रकाश माने, समृद्धी बाळासो बनसोडे यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्रेप्पन्न विद्यार्थी समाविष्ट झाले होते त्यापैकी २८ विद्यार्थी पात्र झाले आहेत. प्रशालेतील राजनंदिनी अनिल गायकवाड हिने मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण विभागात पाचवा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्यात १०२ या क्रमांकाने यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हनुमंत वगरे, पर्यवेक्षक बबन शेलार, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख युवराज पाटील, धनाजी जाधव, सुनिल सोनार, मनिषा मासाळ, नितिन घोडके, हैदर मुलाणी, मंगल रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, जनरल बॉडी सदस्य डॉ.राजेंद्र जाधव, विभागीय अधिकारी कमलाकर महमुनी,ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, स्थानिक स्कूल कमेटी सदस्य बसाप्पा येडसे, गोविंद चौधरी,सेवानिवृत्त प्राचार्य साहेबराव पवार,संभाजी रोंगे,अंबादास पवार व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.