मंगळवेढा / प्रतिनिधी
-----------------------------
लवंगी ता.मंगळवेढा येथील वायरमन बिलाल अब्दुल करीम शेख वय 27 वर्ष यांचा मंगळवेढा शहरात सोमवारी रात्री काम करताना विजेच्या शाॅकने पोलवरून खाली पडून मयत झाले असता लवंगी येथे जाऊन कुटुंबियांना भेटून सांत्वन करत आधार दिला. शासनाकडून विमा,फंड, ग्रॅज्युटी,रजेचा पगार असे जवळपास 35 लाख रूपये मदत मिळवून देण्यासाठी आमदार साहेबांनी महावितरणच्या अधिकार्यांना सुचना दिल्या व कै.बिलाल यांच्या पत्नीस महावितरण विभागाच्या ऑफीसमध्ये क्लार्क पदावरती नोकरी वरती घेण्याबाबत अधिक्षक अभियंता श्री.पडळकर सो यांना सुचना दिल्या. व सर्व प्रकारच्या मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले....
यावेळी सोबत लतिफ तांबोळी, बसवराज पाटील, लवंगीच्या सरपंच अर्चनाताई निकम , महावितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते