मंगळवेढा- ऑल इंडिया पॅंथर सेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, October 28, 2020

मंगळवेढा- ऑल इंडिया पॅंथर सेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न


 मंगळवेढा / प्रतिनिधी

ऑल इंडिया पॅंथर सेनेचा कार्यकर्ता मेळावा व तालुका पदाधिकारी निवडीचा  कार्यक्रम ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शासकीय  विश्रामगृह येथे पार पडला. 

यावेळी राजु जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी, भिकू काळुंखे तालुका संघटक, नितीन साळवी आयटी सेल प्रमुख, अमोल लांडगे तालुका सचिव, सत्यजीत सोनवले तालुका युवक अध्यक्ष म्हणून  निवड करून राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.


यावेळी बोलताना दिपक केदार म्हणाले की  तालुक्यांमध्ये दीनदलित व उपेक्षित समाजावर उच्चवर्णीय समाजातील काही जातीयवादी समाजकंटक यांच्याकडून अत्याचार होत आहे व त्यांच्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले असता पोलीस तसेच स्थानिक इतर समाजातील पुढारी व नेतेमंडळी गुन्हा नोंद करू नये, म्हणून त्यांच्यावर दबाव आणतात व समाजकंटकांना पाठीशी घालतात. ऑल इंडिया सेना दलित, वंचित,बहुजन यांच्या संरक्षणासाठी तसेच संविधान व आरक्षण वाचण्यासाठी मंत्रालयावर हजारो पॅंथरसहित लवकरच हल्लाबोल मोर्चा घेऊन येणार आहे, त्याचप्रमाणे या देशात व राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे. त्या पीडित महिला व पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे काम  करीत आहे. 


पुढे बोलताना मंगळवेढा तालुक्यातील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटन बांधणी करून संघटना वाढवण्यास परिश्रम घ्यावे व शोषित, पीडित समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करावे असे म्हणाले. यावेळी  राष्ट्रीय सचिव चेतन भाई इंगळे व तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.


या मेळाव्यास महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे, अँड.महेंद्र वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी सरवदे, अशोक माने, शशिकांत रोकडे, प्रा.एम.एस गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, वंचितचे तालुकाध्यक्ष वैभव भंडारे, शहराध्यक्ष सोमनाथ ढावरे, येताळा खरबडे, सत्यवान सोनवले, गणेश बनसोडे, रंजीत सोनवले, सतीश लोकरे, महेश दंदाडे, विनोद लोकरे, नामदेव कसबे, अण्णा लोकरे,  विकास लोकरे, अनिल थोरात, दिपक वाघमारे, सुरेश कसबे, लखन शिकतोडे, पोपट कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रविंद्र आठवले यांनी सर्वांचे आभार मानले.

Pages