मंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्या - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, July 1, 2020

मंगळवेढयाच्या वकिल महिलेची सोलापूरात गळफास घेवून आत्महत्यामंगळवेढा / प्रतिनिधी

---------------------------

               मंगळवेढया कन्या असलेल्या अ‍ॅड. स्मिता धनंजय पवार (वय 31) या महिलेने बुधवार दि. 1 जुलै रोजी दुपारी 2.50 वाजण्यापुर्वी अज्ञात कारणावरून सोलापूर येथील राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

  याबाबत अधिक माहिती अशी की,मंगळवेढा येथील विठ्ठल गोवे यांची कन्या अ‍ॅड स्मिता हिचा विवाह सोलापूर येथील धनंजय पवार यांचेसमवेत 6 मे 2018 रोजी झाला असून त्या सोलापूर येथील न्यायालयात प्रॅक्टीस करत होत्या. बुधवार दि. 1 जुलै रोजी दुपारी 2.50 वाजण्यापुर्वी सोलापूरातील जुनी पोलिस लाईन मुरारजी पेठ येथील राहते घरी पहिल्या मजल्याच्या बेडरूममध्ये अज्ञात कारणावरून  नारंगी रंगाच्या साडीने छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली. उपचारासाठी  तीला सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच ती मयत झाली.त्याची खबर डॉ.अनिकेत मानेकर यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार काझी हे करीत आहेत.

Pages