कोरोनावर शासनाने निश्चित केलेल्या दरपत्र दराने उपचार मिळावा -शिवबुध्दचे संदिप मुटकुळे - Pantnagari Times

Breaking News

Thursday, July 2, 2020

कोरोनावर शासनाने निश्चित केलेल्या दरपत्र दराने उपचार मिळावा -शिवबुध्दचे संदिप मुटकुळे


मंगळवेढा / मदार सय्यद 

--------------------------------

                    कोरोनावर शासनाने निश्चित केलेल्या दराने उपचार मिळावा यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तालुक्यातील आणि शहरातील खाजगी दवाखान्यांशी सोलापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतने  करार करावा.व रुग्णालयांची नावे जाहीर करावीत.अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आयुक्तांकडे मागणी केली आहे.जिल्ह्यातील सर्व शहरातील प्रत्येक नागरिकाची कोरोना टेस्ट सर्व महानगरपालिका व नगरपरिषद मनपा तसेच खाजगी रूग्णालयात मोफत होणार असल्याचा निर्णय घेण्यात यावा.त्याबद्दल शासनाने निर्णय घ्यावा.तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी कोरनाबाधित पंढरपूर शहरातील नागरीक लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली.

आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनेक कोरोनाबाधितांना इच्छा असुनही खाजगी रुग्णालयात पैशाअभावी उपचार घेता येत नाही.  महापालिका आणि नगरपरिषद, नगरपंचायत व राज्य सरकारच्या अनेक आरोग्य योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक नागरिक पात्र ठरत नाहीत.पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कोरोना बाधित रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेण्यात यावा.यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तालुक्यातील आणि सर्व नगरपालिका आणिनगरपंचायतने खाजगी रुग्णालयाशी करार करावा.

तसेच या रुग्णालयांची नावे शहरामध्ये आणि तालुक्यातील, नगरपंचायत येथे जाहीर करावीत.अशा कोरोना बाधित रुग्णांची बिले शासनाने निश्चित केलेल्यादराने जिल्ह्यातील सर्व नगरपालिकाच्या मार्फत भरली जावीत,अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे आणि आयुक्त व सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पंढरपूर उपविभागीय अधिकारी  सचिन ढोले साहेबकडे संदिप मुटकुळे अशी मागणी केली आहे.

Pages