दारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना - Pantnagari Times

Breaking News

Thursday, July 2, 2020

दारूच्या नशेत मामाने केला विवाहित भाचीचा विनयभंग; सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील घटना


सांगोला / प्रतिनिधी

---------------------------- 


        विवाहित भाची घरात एकटी असल्याची संधी साधून दारूच्या नशेतील मामाने तिच्या घरात घुसून  'तू मला खूप आवडतेस'  म्हणून तिला मिठ्ठी मारून तिचा विनयभंग केला. अचानक घडल्या प्रकारानंतर घाबरलेल्या भाचीने डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले. ही घटना सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे घडली आहे.

पीडित विवाहित भाची २८ जून रोजी दुपारच्या  सुमारास घरात एकटी असताना दारूच्या नशेतील मामाने तिच्या घरात घसून 'तू मला लई आवडते, माझे तुझ्यावर प्रेम असून तुझा नवरा आता दुसऱ्या बाई बरोबर पळून गेला आहे,  तू माझ्यासोबत राहा मी तुला सांभाळतो' असे म्हणून भाचीला मिठी मारून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. 

दरम्यान, मामाने एवढ्यावरच न थांबता तू घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझे काही खरे नाही अशी धमकी देऊन घरातून निघून गेला. मामाने अचानक घरात घुसून असे कृत्य केल्यामुळे व त्याच्या धमकीमुळे भाचीने टेन्शनमध्ये डोकेदुखीच्या डिक्लो प्लस दोन गोळ्या घेतल्याने तिला अस्वस्थ वाटू लागले, नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचाराकरिता दवाखान्यात दाखल केले. याबाबत पीडित भाचीने मामाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Pages