माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या पश्र्चिम महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष पदी निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख - Pantnagari Times

Breaking News

Saturday, July 18, 2020

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या पश्र्चिम महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष पदी निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख


सांगोला / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी सांगोला तालुक्यातील पारे गाव चे सुपुत्र व सीबीएस न्युज मराठी चे संपादक चाँदभैय्या बाबालाल शेख यांची निवड करण्यात आले आहे .समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.दिलीप दिपक कांबळे यांनी संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे मार्फत चाँदभैय्या शेख यांना नियुक्तिचे पत्र देण्यात आले आहे.संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष अभिजित आपटे , प्रदेश अध्यक्ष दिपक दिलीप कांबळे ,राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे ,विभाग आघाडीच्या  मार्गदर्शक अमृताताई भंडारी मा.प्रकाश भारती तसेच संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे यांच्या सुचने नुसार संघटनेच्या या अतिमहत्वाच्या पदावर चाँदभैय्या शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 चाँदभैय्या शेख हे सोलापूर जिल्ह्यात  पत्रकार म्हणुन उत्तम काम करत असताना सकारात्मक बातमीदारी केली.अनेक सामाजिक विषयांना आपल्या निर्भिड,निपक्ष आणि रोकठोक बातमीदारीचे माध्यमातुन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांचा दांडगा जनसंपर्क,पत्रकारीते मधील चांगला अनुभव,सामाजिक प्रश्नांची जाण, प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करण्याच्या पध्दतीमुळेच त्यांची पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .निवडीची बातमी कळताच सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष करण्यात आला .

 

Pages