वैरागचे ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. तीन दिवसांमध्ये पती-पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्याने कौठाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, July 15, 2020

वैरागचे ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. तीन दिवसांमध्ये पती-पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्याने कौठाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला



वैराग / प्रतिनिधी

------------------------

       वैराग ता.बार्शी येथील ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन फयाजोद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे  राहत्या घरी निधन झाले

मृत्युसमयी ते 57 वर्षाचे  होते त्यांच्या पश्चात  एक मुलगी, दोन मुले, नातू नातवंडे, असा मोठा परिवार आहे 

रविवारी सकाळी त्यांच्या पत्नी आरिफाचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते आणि आणि बुधवारी दुपारी नसरुद्दीन यांचेही हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसरुद्दीन कौठाळकर हे साप्ताहिक वृत्तपत्र विजयचे संपादक असून सामाजिक कार्यकर्ते होते सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून जात होते त्यांच्या निधनाने वैराग परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे

वैराग चे रिक्षाचालक समीर कौठाळकर व अमन वडापाव सेंटरचे मालक मुजम्मिल कौठाळकर यांचे ते वडील होत. नसरुद्दीन कौठाळकर हे मन मायाळू स्वभावाची असल्यामुळे त्यांच्या निधनाने वैराग परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

सोशल डिस्टन्स चे पालन करत त्यांना वैराग येथील मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांना दफन करण्यात आले.

Pages