सोलापूर- जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये 12 पुरुष तर 8 महिलांचा समावेश होतो.तर 29 जण बरे झाले आहेत.यात पुरुष 14 तर 15 महिलांचा समावेश होतो.
आज उत्तर सोलापूर येथील बेलाटी येथे एक महिला एकरुख येथे एक महिला, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथे 1 पुरुष ,भंडारकवठे येथे एक महिला, बक्षीहिप्परगा येथे एक पुरुष ,सांगोला मध्ये वाकी घेरडी येथे पुरुष,
माढा मध्ये रिधोरे येथे एक महिला, दगडअकोले येथे दोन पुरुष एक महिला.
पंढरपूर येथे रुक्मिणीनगर एक महिला, मोहोळमध्ये नाईकवाडी वस्ती ,एक पुरुष, आष्टी येथे पुरुष, कामती बुद्रुक येथे 1 पुरुष विरवडे येथे 1 पुरुष, बार्शी मध्ये पिंपळगाव ढाळे येथे एक पुरुष, वैराग येथे दोन महिला तर अक्कलकोट, स्टेशन रोड एक पुरुष, बुधवार पेठ एक पुरुष बाधित असल्याची नोंद घेण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
आज मयत नोंद झालेली व्यक्ती पिंपळगाव ढाळे, तालुका बार्शी येथील 65 वर्षाचे पुरुष असून पाच जुलै रोजी त्यांना सकाळी साडेअकरा वाजता जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पाच जुलै रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे निधन झाले. अक्कलकोट येथील खासबाग येथील 68 वर्षाचे पुरुष मृत्यू पावल्याची नोंद घेण्यात आली आहे .त्यांना दोन जुलै रोजी रात्री 12 च्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सात जुलै रोजी रात्री त्यांचे निधन झाले ,तर तिसरी मयत झालेली व्यक्ती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पाठीमागे पंढरपूर येथील राहणारे ऐंशी वर्षाचे पुरुष असून त्यांना 28 जून रोजी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सात जुलै रोजी सायंकाळी त्यांचे निधन झाले.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 607 इतकी झाली आहे. यामध्ये 387 पुरुष तर 220 महिला आहेत यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 23 पुरुष तर सात महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 307 आहे यामध्ये 202 पुरुष 105 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 270 आहे यामध्ये 163 पुरुष तर 107 महिलांचा समावेश होतो.