मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्ह - Pantnagari Times

Breaking News

Saturday, June 20, 2020

मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात येऊन गेलेला तो पेशंट निघाला कोरोना पॉझिटिव्हमंगळवेढा / प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात दि.9 जून रोजी सोलापुरातील एक व्यक्ती येऊन गेला होता त्यास लक्षणे दिसत असल्याने कोरोना चाचणी केली असतात ती पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती Prantadhikari Uday Singh Bhosale प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.  Mangalwedha hunnur solapur person positive

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आज दि.20 जून रोजी कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आलेला एक व्यक्ती मंगळवेढा तालुक्यात हुन्नूर गावी 9 जून रोजी आली असल्याचे आढळून आले आहे. सदर व्यक्ती गावात 9 ते 11 तारखेपर्यंत वास्तव्यास असून 11 तारखेस तो परत सोलापूर येथे परत गेला असून त्या व्यक्तीस कोरोनाची लागण तालुक्यात येण्यापूर्वी झाली होती.अथवा इथून गेल्यावर सोलापूर येथे झाली याबाबत स्पष्टता अजून झाली नाही. तरीदेखील खबरदारी चा उपाय म्हणून त्याच्या संपर्कातील 11 व्यक्तींना ( high risk contacts) मंगळवेढा येथील केंद्रामध्ये quarantine केलेले आहे. आणि 10 व्यक्तींना ( low risk contacts ) होम quarantine केलेले आहे. त्यापैकी कोणालाही लक्षणे दिसून येत नाहीत. उद्या 21 जून रोजी सर्व (high risk contacts) 11 व्यक्तींचे तपासणी करीता नमुने घेण्यात येणार आहेत. या सर्व व्यक्तींवर ती वैद्यकीय प्रशासन लक्ष ठेवून आहे.अजून पर्यंत तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.

Pages