Lockdown: मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Pantnagari Times

Breaking News

Saturday, May 2, 2020

Lockdown: मंगळवेढा तालुक्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


मंगळवेढा / प्रतिनिधी

विनापरवाना दारू घेऊन जाणारी स्कार्पिओ व बोलेरो जीप पोलिसांनी पकडली आसून याप्रकरणी एकून तिघां विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे 6 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे 

याबाबत अधिक माहिती अशी की 2 मे रोजी सायंकाळी पाच वाजता बठाण गावच्या अलिकडे सुमारे एक किमी अंतरावर एम एच 13  ए के 48 02 या क्रमांकाची बोलेरो जीप अवैद्य दारू नेत असताना पोलिसांना आढळून आली तर एम एच 43 ए के 7483 ही स्कार्पिओ सुद्धा अवैद्य  दारू घेऊन जात होती. या दोन्ही जिपमधून पोलिसांनी 24 हजार 960 रुपयांचा अवैद्य दारूसाठा जप्त केला आहे. याची फिर्याद पोलीस नाईक उदय ढोणे,यांनी मंगळवेढा पोलिसात दिल्याने पोलिसांनी राजेंद्र अण्णा कोळी राहणार मुढे गल्ली मंगळवेढा,अशोक तुकाराम कोळी राहणार इंगळे गल्ली मंगळवेढा, व संजय गुंडोपंत कोळी राहणार बठाण या तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65 अ व 65ई प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवलदार घोळसगावकर करीत आहेत

Pages