मंगळवेढा / प्रतिनिधी
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने जिल्हा प्रशासनाने गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्याची संसार उपयोगी साहित्य किट वाटप करावे असे आव्हान केले होते या हाकेला हाक देत मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील H.P.L ग्रुप (हुन्नूर प्रीमियर लीग. स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंनी जीवनावश्यक वस्तूचे किट हुन्नूर येथील कोरोना वॉरियर्स यांच्या हस्ते
गोरगरिब गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट देऊन माणुसकीचा आधार दिला हुन्नूर येथील H.P.L ग्रुप (हुन्नूर प्रीमियर लीग. स्पोर्ट मधील सर्व खेळाडूंच्या संकल्पनेतून व त्यांच्या उपक्रमातून 20 गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. हा उपक्रम सलग दुसऱ्यांदा राबवण्यात आला पहिल्यांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे यांच्या हस्ते देण्यात आले होते पण गरजू लोकांची उपासमार पाहून HPL ग्रुपमधील सर्व खेळाडूंनी दुसऱ्यांदा अन्नधान्याचे कीट वाटप करण्याचा निर्णय घेतला यामध्ये ज्वारी गहू,गोडतेल, तूर डाळ हरभरा डाळ,एक आंघोळीचा साबण,एक कापडाचा साबण, मसाल्याचे सर्व पदार्थ असे किट तयार करण्यात आले हे किट हुन्नूर परिसरामध्ये एक योद्धा प्रमाणे लढणारे अत्यावश्यक सेवेमधील मधील डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स, पत्रकार, हे लक्षात घेऊन HPLग्रुप मधील तरुण मुलांनी निमंत्रित करून यांच्या हस्ते देण्याचे ठरवले.
यावेळी डॉक्टर संजय रुपनर, डॉक्टर यशवंत कराडे, डॉक्टर सोमनाथ वाघमोडे, पोलीस पाटील नामदेव रेवे, आरोग्य सेविका टी.डी. घोरपडे,गिरीजा मेडिकलचे साधू नरळे, माहेश्वरी मेडिकलचे लक्ष्मण पांढरे, बिरोबा मेडिकलचे अनिल देवकते, पत्रकार मदार सय्यद, यांच्या हस्ते गोर गरीब गरजू लोकांना अन्नधान्याची किट दिल्याने परिसरामधील सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणारी H.P.Lग्रुपमधील तरुण मुले परिसरातील लोकांना आधार बनत असल्याचे परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया देत आहेत
या सर्व कामासाठी हुन्नूर येथील H.P.L ग्रुप (हुन्नूर प्रीमियर लीग. स्पोर्ट मधील सर्व सदस्य व खेळाडूंनी उपस्थित राहून परिश्रम घेतले
--------------------------------------------------------
महाराष्ट्रासह,सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9970090885 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा .WhatsApp करा आणि तुमचे नाव टाईप करून पाठवा