Coronavirus : लक्ष्मी-दहिवडीची याञा रद्द,उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल :- पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, May 2, 2020

Coronavirus : लक्ष्मी-दहिवडीची याञा रद्द,उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल :- पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे


मंगळवेढा / प्रतिनिधी 

संपूर्ण महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडीतील लक्ष्मी देवीची याञा ८ मे २०२० पासून सुरू होणार होती परंतु कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता याञा भरविता येणार नसल्याचे मंगळवेढा पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठक ग्रामस्थांना सांगितले.

लक्ष्मी दहिवडी च्या लक्ष्मी देवीची याञा खुप मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी भरत असते. पारंपारिक ढोल वाद्यांच्या गजरात, पोतदार अशा अनेक परंपरेतुन चालत आलेली लक्ष्मी देवीची याञा यावर्षी होणार नाही. शिवाय मंदिरात फक्त पुजारी यांनी पुजा करावी असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यावर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सर्वञ प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लक्ष्मी दहिवडी मध्ये कोणत्याही प्रकारे कसले ही धार्मिक विधी, अथवा कार्यक्रम होणार नाहीत. या शिवाय जय कोणी जाणीव पुर्वक ४ पेक्षा जास्त लोक एकत्र आल्याचे जर पोलिस पाटील मधुकर पाटील, ग्रामसुरक्षा दल यांच्या निर्देशनास आल्यास कलम १४४ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

      लक्ष्मी दहिवडीतील लक्ष्मी देवीच्या मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात आली असुन भाविकांनी, ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गानी मंदिरात दंडवत घेणेसाठी अथवा दर्शनासाठी घेऊ नये अन्यथा पोलिस प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल केला जाईल.

    लक्ष्मी दहिवडी तील ग्रामपंचायत कार्यालय १ मे रोजी सोशल डिस्टन्सिंग मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, गोपनीय विभाग प्रमुख राजकुमार ढोबळे, पोलिस पाटील मधुकर पाटील, सरपंच मनिषा जुंदळे, उपसरपंच अनिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिता राजमाने, रामेश्वर जुंदळे,  शहाजी सोनवले, पुजारी लाला सोनवले, गावकामगार तलाठी श्रीरंग लोखंडे, ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती प्रकाश जुंदळे, अनिल पाटील, विलास पाटील, पोलिस काॅन्टेबल गणेश पाटील आदीसह ग्रामसुरक्षा दल उपस्थित होते.

Pages