युटोपियन शुगर्सने तयार केले पायडल पोर्टेबल स्टॅन्ड :- कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, May 6, 2020

युटोपियन शुगर्सने तयार केले पायडल पोर्टेबल स्टॅन्ड :- कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील


मंगळवेढा / प्रतिनिधी

युटोपियन शुगर्स हा सामाजिक क्षेत्रांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो सध्या कोविड 19 या विषाणू मुळे सध्या संपूर्ण जगामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे.युटोपियन शुगर्स कारखान्याने याबाबतीत संवेदनशीलता बाळगत हँड सॅनिटायझर ची  WHO च्या मार्गदर्शक तत्वानुसार वेगवेगळ्या साइज मध्ये व माफक दरांमध्ये सर्वांकरिता निर्मिती ती करून विक्री करण्यात येत आहे युटोपियन शुगर्स च्या कोगो हँड सॅनिटायझर च्या उत्पादनास बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.आता नुकताच दुसरा लॉकडाऊन संपून तिसरा लॉकडाऊन सुरू आहे .विविध उद्योग क्षेत्रात झोन नुसार शिथिलता देण्यात आली आहे व काही उद्योग क्षेत्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्योजकांना कामगारांच्या काळजीबाबत जागृत राहून उपाय योजनाकरणे गरजेचे असल्याबाबतच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात येत आहेत त्या अनुषंगाने शहरातील व औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांना हँड वॉश साठी स्प्रे/जेल पंपाची  आवश्यकता निर्माण झालेली आहे व सातत्याने याबाबतीत युटोपियन शुगर्स कडेही मागणी करण्यात येत आहे. मात्र ,ज्या पंपाची किंमत कोरणा विषाणूच्या प्रादुर्भाव पूर्वी फक्त 5 ते 6 रुपये होती त्याची किंमत सध्या बाजारात 35 ते 40 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून त्याची उपलब्धता ही खूपच कमी आहे यावर उपाय म्हणून युटोपियन शुगर्स ने  नवीन पोर्टेबल पायडल स्टॅन्ड तयार केलेले आहे प्रत्येक कंपनीमध्ये किंवा घरामध्ये असणारे जुने स्प्रे पंप किंवा जुन्या हँडवॉश बाटल्यांचे जेल चे  पंप चा वापर करून त्यांनी सॅनिटायझर बाटलीला कोणत्याही प्रकारचा स्पर्श न करता युटोपियन शुगर्स ने तयार केलेल्या पायडल स्टॅन्ड च्या साह्याने सॅनिटायझर चा वापर करणे सोयीचे झाले आहे. कमी किमतीत हँड सॅनिटायझर बरोबरच पोर्टेबल पायडल स्टॅन्ड ही युटोपियन शुगर्स उपलब्ध करून देणार आहे यामुळे बाजारात उपलब्ध असणाऱ्या सध्याच्या किमती पेक्षा कमी किमतीत जास्त नागरिकांची आवक-जावक असेल त्याठिकाणी सदरच्या पोर्टेबल पायडल स्टँड चा वापर करून सुरक्षितता बाळगणे सोपे होणार आहे.


त्याचप्रमाणे युटोपियन शुगर्स हा नेहमीच ऊस उत्पादकांच्या हिताशी बांधिलकी जपणारा कारखाना म्हणून परिचित आहे युटोपीयन शुगर्स सर्व ऊस उत्पादकांना मोफत हँड सॅनिटायझर घरपोच देण्याचा निर्णय कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या सूचनेनुसार यापूर्वीच घेतलेला आहे .,मात्र मागील काही दिवसांपासून लॉक डाऊन चालू असल्याने ऊस उत्पादक यांना घरपोच हँड सॅनिटायझर देण्यामध्ये अडचणी येत होत्या.प्रशासनाने  आता काही प्रमाणामध्ये शिथिलता दिली असून त्यामुळे  युटोपियन शुगर्स च्या  ऊस उत्पादक यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मोफत हँड सॅनिटायझर घर पोहच वाटप करण्यात येणार आहे

युटोपियन शुगर्स ने  तयार केलेल्या पोर्टेबल पायडल स्टॅन्ड चे प्रात्यक्षिक करताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील साहेब यांचे समवेत कारखान्याचे खाते प्रमुख ,अधिकारी वर्ग दिसत आहेत.

Pages