सांगोला / प्रतिनिधी
संपूर्ण मे महिना लॉकडाऊन मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हातात पैसा नसल्याने शेतीची कामे करता येणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून मे महिन्यात शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी शासनाने आदेश जारी करावा,अशी विनंती शिवबुध्दचे सांगोला शहराध्यक्ष विशाल देशमुख यांनी केली आहे.
जून महिन्यात पावसाळा सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मे महिन्यात शेतीची कामे उरकली नाहीतर जून मध्ये पेरणी करायला उशीर होतो.त्यातल्या त्यात शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सावकार कर्ज द्यायला तयार नाही आणि कोणी सोने गहाण ठेवायला तयार नाही अशा परिस्थितीत बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे बँकांवर अवलंबून असलेला शेतकरी कर्ज घेण्यासाठी बँकांकडे धाव घेईल. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याचे नियम पायदळी तुडवले जातील. त्यासाठी बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शिवबुध्दचे विशाल देशमुख यांनी काही सूचना केल्या आहेत.
सामाजिक अंतर राखण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेत न बोलविता बँक अधिकाऱ्यांनीच गावा गावात जाऊन कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून द्यावीत. शिवाय मागील असलेले कर्ज आणि आताचे नवीन कर्ज विचारत घेता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसे आदेश शासनाने काढून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी विनंती विशाल देशमुख यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात तीन झोन करण्यात आले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या भागाला रेड झोन मध्ये टाकण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात अशी परिस्थिती नसल्याने त्या भागांना ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये टाकण्यात आले आहे. हे झोन शहरापुरते मर्यादित आहेत का ग्रामीण भागापूरते हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे ही शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे सांगोला शहराध्यक्ष विशाल देशमुख यांनी सांगितले आहे.त्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतक-यांना कर्ज उपलब्ध करून घ्यावे.अशी मागणी महाविकास आघाडी सरकाराचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे असे मत शिवबुध्दचे सांगोला शहराध्यक्ष विशाल देशमुख यांनी सांगितले आहे..
--------------------------------------------------------
महाराष्ट्रासह,सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक बातमीचे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9970090885 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा व.What'sapp करा आणि तुमचे नाव टाईप करून पाठवा