शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान :- दिपक (आबा) साळुंखे-पाटील - Pantnagari Times

Breaking News

Sunday, May 17, 2020

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान :- दिपक (आबा) साळुंखे-पाटील


सांगोला / प्रतिनिधी

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशामुळे सांगोला तालुक्‍यांमध्ये म्हैसाळचे पाणी अखेरच्या टप्प्यांमध्ये आले आहे. हंगिरगे येथील वाघ तलावात पाणी पोहचातच सदर पाण्याचे पूजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सचे पालन करीत करण्यात आले.

म्हैसाळ योजनेचे पाणी या भागात दाखल झाले आणि आज जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान असल्याचेही पाणी पूजना दरम्यान दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुग्रेशन सावंत, माजी सरपंच आप्पासाहेब वाघ, धोंडीराम काटे, अशोक चोरमुले, दिलीप मोटे, आबासो कोरे, बिरू घुणे, बंडू साबळे, सुरेश काटे, सर्जेराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. 

दुष्काळी तालुक्‍यातील नागरिकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी जलसंपदामंत्री सांगोला येथे आले असता, तालुक्‍याच्या दुष्काळी भागाला टेंभू व म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली होती. दरम्यान महापुराचे पाणी नदी, नाले, ओढे यामार्फत वाहून जात आहे. तेच पाणी दुष्काळी भागाला म्हणजे सांगोला तालुक्‍याला सोडले तर या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. तसेच शासनाचा पाण्यावर कोट्यावधी रुपये होणारा खर्च देखील वाचणार आहे.

याबाबतही विचार करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील काही दिवसापूर्वीच दुष्काळी भागाला महापुराचे पाणी सोडणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबरोबर संबंधित खात्याला आदेश देऊन म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्‍याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोडण्यात यावे असेही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगोला तालुक्‍यातील हंगिरगे येथे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे. सदरचे पाणी गावात दाखल होताच शेतकरी नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे

-------------------------------------------------

महाराष्ट्रासह,सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9970090885 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा .WhatsApp करा आणि तुमचे नाव टाईप करून पाठवा

Pages