Breaking,आज दुपारपासून तीन दिवस सोलापूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार-मिलिंद शंभरकर - Pantnagari Times

Breaking News

Sunday, April 19, 2020

Breaking,आज दुपारपासून तीन दिवस सोलापूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार-मिलिंद शंभरकर


सोलापूर / प्रतिनिधी


ठळक मुद्दे सोलापुरात कोरोनाचे बाधित रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने घेतला निर्णयजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सोलापूर शहर पोलीस अलर्टसोलापूर शहर पोलिसांनी ठिकठिकाणी लावला बंदोबस्त

 सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी सायंकाळी आदेश पारित केला आहे. त्या आदेशानुसार २०/०४/२०२० दुपारी २ ते २३/०४/२०२० रात्री १२  वाजेपर्यंत संपूर्ण सोलापूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे. 

यानुसार उद्या दुपारी दोन वाजल्या पासून 23 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टोटल संचारबंदी घोषित केली आहे. शहरात येणाऱ्या सर्व हद्दी बंद करण्यात येत आहेत. त्याच बरोबर सोलापुरातील गेल्या काही दिवसात ज्या भाजी, किराणा, फळ, मेडिकल स्टोअर्स, बँका यांच्या सेवा सुरू होत्या त्याही उद्या दुपारी दोन नंतर बंद करण्यात येणार आहेत. सर्व सरकारी कार्यालये ही या काळात बंद राहतील. पास असले तरी अत्यावश्यक सेवा मधील पोलीस डॉक्टर व अन्य अधिकारी यांना वगळून इतरांना या काळात शहरात फिरण्यास प्रतिबंध लागू होणार आहे.

सकाळी सहा ते नऊ या वेळेत दूध वाटप आणि विक्रीला परवानगी आहे तर पेट्रोल पंप सकाळच्या सत्रात केवळ पाच धारक डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनासाठी उघडी राहतील असेही आदेशात म्हटले आहे. 

सोलापूर शहर आणि जिल्हा पोलिसांनी आजही सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेत विनाकारण भटकणाऱ्या वर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

Pages