सोलापूर / प्रतिनिधी
कोरोना मुक्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये आज कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापुरातील पाछा पेठ परिसरातील किराणा दुकान चालकाची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आलई आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही चाचणी करण्यात आली होती. 10 एप्रिल रोजी पहाटे त्याला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली पाच-सहा पेठ परिसरातील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत