Breaking – घाबरू नका ; सोलापुरात कोरोनाचा रुग्ण नाही ; जिल्हाधिकारी यांची स्पष्टोक्ती - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 8, 2020

Breaking – घाबरू नका ; सोलापुरात कोरोनाचा रुग्ण नाही ; जिल्हाधिकारी यांची स्पष्टोक्तीसोलापूर / प्रतिनिधी


सोलापुरात कोरोना चा रुग्ण आढळल्याची बातमी ही चुकीची असून सोलापुरात असा कोणताही रुग्ण नसल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माहिती दिली.

सोलापुरातून तो गेलेला मजूर ग्वाल्हेरमध्ये संसर्गित झालेला होता अशी माहिती आहे.परंतु त्याचा सोलापुरातील इतर लोकांशी संपर्क आला आहे का याची प्रशासन खातरजमा करत आहे सोलापूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये .प्रशासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे आणि लॉकडाऊन चे तंतोतंत पालन करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाचे मुद्दे

सोलापुरातून ग्वाल्हेरला गेलेला द्राक्ष नेटिंग मजूर कोरोना संसर्गित.


सोलापुरातील एका तालुक्यातील एका गावात द्राक्ष नेटिंगसाठी आला होता हा मजूर


त्या गावात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू


1 एप्रिल रोजी सोलापुरातुन हा मजूर ग्वाल्हेरला गेला होता


तपासणी केल्यानंतर कोरोना संसर्गित असल्याचा अहवाल आला आहे .

Pages