सोलापूर / प्रतिनिधी
सध्या पूर्ण जगामध्ये थैमान घालत असलेला कोरोना व्हायरसच्या जाळ्यात सोलापूर जिल्हा अडकलेला पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर जाऊन पोहचला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यात आजच एक महिला पॉझिटिव्ह निघालेली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्या महिलेच्या संपर्कातील लोकांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
आज प्राप्त अहवालांमध्ये नव्याने 01 रुग्ण महिला positive आढळली असून तिचा उपचार घेत असताना मृत्यू झाला असून सदर महिला ही भारत रत्न इंदिरा नगर परिसरातील असून तिच्या संपर्कातील ०८ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. भारत रत्न इंदिरा नगर परिसराला CONTEMNEMT झोन जाहीर करण्यात आले असून सदर भाग सील करण्यात आला आहे. सदर भागात मनपा मार्फत सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.