महाराष्ट्रातील सर्व बँका, पतसंस्था,किराणा दुकान,दूध डेरी,यांचे समोर सँनीटायझर रूम बनवावी:- संदीप पवार - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, April 29, 2020

महाराष्ट्रातील सर्व बँका, पतसंस्था,किराणा दुकान,दूध डेरी,यांचे समोर सँनीटायझर रूम बनवावी:- संदीप पवार


मंगळवेढा / प्रतिनिधी

     महाराष्ट्र समोर कोरोणाचे संकट अधिक गडद होत आहे दररोज कोरूना चे किती तरी पेशंट सापडत आहेत  आणि किती तरी किती लोकांना  आपला जीव  गमवावा लागत आहे.  तीन मेपर्यंत लॉक डाउन असल्याने सर्व उद्योगधंदे बंद आहेत  किराणा भाजीपाल्यांचे दुकाने तास दोन तासासाठी उघडी आहे सध्याच्या काळात सर्वात धोक्याचे ठिकाण म्हणून बँकेकडे पाहता येईल लोकांच्या जनधन योजनेच्या अकाउंटमध्ये पाचशे रुपये जमा होत आहेत पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होत आहे लोकांमध्ये अशी अफवा आहे की हे पैसे लवकर नाही काढल्यास माघारी जातील त्यामुळे लोक बँकेसमोर हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहे सोशल डिस्टन्स पुरता बोजवारा उडालेला आहे बँकेमध्ये एक तर कर्मचारी वर्ग अपुरा आहे आणि त्यात ही गर्दी बँक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे ही गर्दी अशीच वाढत राहिली तर बँकेतील कर्मचाऱ्यांना याचा फार मोठा धोका निर्माण होणार आहे यावर उपाय म्हणून बँकेसमोर सँनीटायझर रूमवर बनवली तरच हे कर्मचारी वाचतील अन्यथा वाचणार नाहीत तोरणांनी आता गावागावात हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे सांगोला तालुक्यातील घेरडी या गावात कोरूना सारी या या आजाराचा एक रुग्ण सापडला आहे त्याचा चुलत भाऊ महाराष्ट्र बँक वाडेगाव  मध्ये बँक कॅशियर आहे त्याच्यामुळे किती जणांना संपर्क झाला आहे  हे कळणे अशक्य झाले पाचशे रुपयासाठी लोक बँकेसमोर गर्दी करून उभे आहेत आणि त्यातच एखाद्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोणाची लागन झाली तर त्याच्याकडून किती जणांपर्यंत पोहोचू शकतो हे आपण  कल्पनाही करू शकणार नाही यावर इलाज म्हणून बँकेसमोर जर सँनीटायजर रूम बनवली तर त्यातून हजारो लोक वाचतील आणि आतील जे कर्मचारी आहेत त्यांच्याही वाचण्याचा मार्ग मोकळा होईल हाताला लावून एक व्यक्ती बँकेत सोडला तर सोशल डिस्टन्स पाळून बँकेचे व्यवहार व्यवस्थित रित्या करता येतील अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अतिशय भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे शहरी भागातील विचार केला तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील माणूस जास्त फिरत आहे त्यामुळे खेडेगावातील परिस्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे दुधाच्या निमित्ताने किराणामालाच्या निमित्ताने खेडेगावातील माणूस सगळीकडे फिरत आहे म्हणून कोरणा पासून जर बचाव करायचा असेल तर एकमेव मार्ग सँनीटायजर रूम बनववी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप पवार यांनी केली आहे

Pages