पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील एकही रेशन कार्ड धारक रेशनच्या मालापासून वंचित राहणार नाही :- याबाबत आमदार भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी केला भ्रमणध्वनी द्वारे संपर्क - Pantnagari Times

Breaking News

Thursday, April 9, 2020

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील एकही रेशन कार्ड धारक रेशनच्या मालापासून वंचित राहणार नाही :- याबाबत आमदार भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी केला भ्रमणध्वनी द्वारे संपर्कमंगळवेढा / मदार सय्यद

-----------------------------------

              पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील ऑफलाईन रेशन कार्ड धारकांच्या प्रश्नासाठी काल बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भ्रमणध्वनी दारे संपर्क साधला असून आज गुरुवारी याबाबतचे आदेश संबंधित विभागाला आणि जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देणार आणि एकही रेशन कार्ड धारक रेशनच्या मालापासून वंचित राहणार नाही अशी माहिती आमदार भारत भालके यांनी पंतनगरी टाईम्सशी बोलताना दिली

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक रेशन कार्ड धारक असे आहेत की त्यांची ऑनलाइन नोंदणी झाली नाही. अशा रेशनकार्डधारकांना रेशनचा माल मिळत नव्हता. त्यातच कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार गेला. दररोज कामाला गेलं तर रात्रीची भाकरी मिळते अशा कामगारांची दयनीय अवस्था झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने तीन महिन्याचे राशन देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक रेशन कार्ड धारक आहेत ज्यांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाहीत. त्यामुळे ते रेशनच्या माला पासून वंचित आहेत. आशा कार्ड धारकासाठी आज आमदार भारत भालके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे  संपर्क केला आणि ऑफलाइन रेशन कार्डधारकांना रेशन मिळावे अशी विनंती केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आजच त्याबाबतचा आदेश काढू आणि सर्व रेशनकार्डधारकांना माल मिळेल याची हमी आमदार भारत भालके यांना दिली. याच प्रमाणे शेतकऱ्याचा माल वाहून नेणारे ट्रक, टेम्पो यांच्या इंधनाचा ही प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अजित पवार यांनी आमदार भारत भालके यांना दिले

Pages