पंढरपूर / प्रतिनिधी
संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्र भर कोरोनाने थैमान घातले असून यावर आजपर्यंत कोणतीही लस उपलब्ध झाली नाही.कोरोनटाईन करणे,सोशल डिस्टन्स ठेवणे याच उपाय योजना व नियंत्रण ठेवणे मानवाच्या हाती राहिले आहे,याचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने जनता कक्र्यर्य,होम कोरोनटाईन, जिल्हाबंदी, कर्मचाराच्या कामात कपात केली आहे.
त्यामुळे ऑनलाईन कामे बंद केली आहेत.यांचा फटका शेतक-यांना बसला आहे.ऑनलाईन कामे बंद केल्यामुळे शेतक-यांना मिळणा-या सुविधा बंद झाल्या आहेत.नवीन मोटार,ड्रिप,विहिरी,शेततळे,पाईपलाईन कांदाशेड वेअरहाऊस ही कामे पाऊसाळाच्या अगोदर करणे गरजेचे आहेत.
अगोदरच शेतकरांच्या मालाला भाव मिळाला नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आला आहे.नवीन पिकांची तयारी करणे शेतकरी शेतीसुविधा मिळण्यापासून वंचित राहत आहे.कोलमडलेली अर्थव्यवस्था रस्तावर आणण्याचे सामर्थ्य शेतक-यांमध्ये आहे.त्यांना वेळीच मदत मिळाली नाहीतर भारत देशाची आणि महाराष्ट्रासह अर्थव्यवस्था आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल.त्यामुळे शेतक-यांना ऑनलाईन सेवा तात्काळ चालू कराव्यात.अशी मागणी व आव्हान शिवबुध्दचे संदिपराजे मुटकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केले आहे.