कोरोना पार्श्वभूमीवर हुन्नूर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय पोषण आहारातील साहित्य वाटप - Pantnagari Times

Breaking News

Thursday, April 9, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर हुन्नूर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय पोषण आहारातील साहित्य वाटप


मंगळवेढा / प्रतिनिधी

-------------------------------

    हुन्नूर ता. मंगळवेढा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ व इतर साहित्याचे वाटप श्री संत चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक साळे,  कॉटन ॲडव्हायझर बोर्डाचे माजी संचालक प्रशांत साळे,उपसरपंच प्रवीणकुमार साळे,मुख्याध्यापक एकनाथ होळकर,अनुराधा स्वामी ग्रामपंचायत सदस्य सौदागर माने यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्या कोरोना संसर्गामुळे सर्व शाळा बंद असून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेमध्ये शिल्लक असलेले तांदूळ व इतर साहित्य सोशल डिस्टन्स ठेवत प्रत्येक शाळेने शाळेतील बालकांच्या पालकांना

बोलावून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व पालकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून साहित्य नेण्याचे आवाहन केल्यानंतर प्रशालेमध्ये आज सर्व विद्यार्थ्यांना झाडाखाली सावलीत उभे करून सोशल डिस्टन्स ठेवत ब शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक विलास आवताडे,शिवाजी काशीद, जगन्नाथ काटकर,बजीरंग चौगुले राजाराम पाटील,गोरखनाथ भोसले,आप्पासाहेब कटरे,महेश कटरे,महादेव घुमरे,संदीप पवार मधुकर,गवळी बाळू गवळी, मारुती आयवळे,वसंत कैकाडी, नंदकुमार खडतरे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Pages