मंगळवेढा / प्रतिनिधी
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने मंगळवेढा तालुक्यातील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दानशूर व्यक्ती कडून गरीब शेतमजूर यांना जीवनावश्यक वस्तूचे चाळीस किट वाटप करण्यात आले असल्याची माहिती मंडलाधिकारी नागनाथ जोध यांनी सांगितले
ग्रामपंचायत महंमदाबाद (हु)तालुका मंगळवेढा येथील शासनाच्या संकल्पनेतून सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत व गावातील दानशूर लोकांच्या उपक्रमातून 40 गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे महंमदाबाद(हु) गावात १०० टक्के लॉकडाऊनचे पालन केले जात आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग गावात होऊ नये म्हणून लोकं घराबाहेर जात नाहीत. त्या कारणाने रोजगार नाही.गावात जवळपास १००ते १५० कुटुंबे रोजंदारीचे काम करुन उदरनिर्वाह करतात मात्र गेल्या १५ दिवसापासून रोजगार नाही. लोकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.लोकांची हीअडचण लक्षात घेऊन शासनाच्या संकल्पनेतून धन्य वाटप करण्यात आले. मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे महसूलचे मंडळ अधिकारी नागनाथ जोध,सरपंच सुरेश हत्तीकर,उपसरपंच यशवंत होळकर,ग्रामसेवक दत्तात्रय विरणक,पोलिस पाटील राजाराम कटरे,रामदास मिस्कर व गावातील दानशूर व्यक्ती आदी जण उपस्थित होते.