मंगळवेढा / प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना व कामगार संघटना( इंटक) यांच्या सहकार्याने व चेअरमन समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यातील अपंग निराधार यांना गरजू व अत्यावश्यक साहित्याचे वाटप खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना सारख्या महा बिमारी जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी ज्यांची हातावर पोट आहेत आशा गरीब अपंग, निराधार गरजू लोकांना सहकार्य करण्याची भूमिका श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या व कामगार संघटनेच्या वतीने समाधान आवताडे यांनी पार पाडली. या गरजू अत्यावश्यक साहित्यामध्ये, साखर, तेल, साबण, चहा, शेंगदाणे. चार प्रकारच्या डाळी, मीठ, सँनिटायझर, मास्क या आशा चौदा प्रकारच्या वस्तू देण्यात आल्या. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील सर्व अपंग निराधारांना व गरजू लोकांना या अत्यावश्यक वस्तू पोहोच करणार असल्याचे मत चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रहार अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, पंचायत समिती माजी सदस्य संजय पवार, प्रहार संघटनेचे तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक, अनिल धोंडमिसे, नवनाथ मासाळ, राजू सावंत, शंभू मामा नागणे, प्रशांत ढगे, अर्चना सदावर्ते उपस्थित होते