शिवनगीत रेशन दुकानदारांचा परवाना निलंबित तहसीलदार रावडे यांच्या कारवाईने तालुक्यातील रेशन दुकानदारांचे यांचे धाबे दणाणले - Pantnagari Times

Breaking News

Friday, April 10, 2020

शिवनगीत रेशन दुकानदारांचा परवाना निलंबित तहसीलदार रावडे यांच्या कारवाईने तालुक्यातील रेशन दुकानदारांचे यांचे धाबे दणाणले


मंगळवेढा / मदार सय्यद

--------------------------------


कोरोनो च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना गरिबांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये यासाठी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार रावडे प्रयत्नशील असताना शिवनगी येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून  

रेशनचा माल ग्राहकांना वेळेवर धान्य न देणे, दुकान वेळेत न उघडणे आणि अरेरावी ची भाषा वापरणे यामुळे शिवनगी येथील रेशन दुकानदारांचा परवाना तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी निलंबित केला आहे. 

राज्यात लॉकडाऊन झाल्याने गरिबांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे अशा काळात त्यांना रेशन धान्य वेळेत व सरकारने दिलेल्या वजनात ते मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने  तहसीलदार स्वप्निल रावडे  मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावात रेशन धान्य सुरळीत वाटप व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र तालुक्यातील शिवनगी येथिल दुकानदारांकडून

रेशनकार्ड धारकांना धान्य कमी वाटप करणे, त्याही नोंद न ठेवणे, कार्ड धारकांशी उद्धट वागणे आदी कार्डधारकांच्या व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येताच तहसीलदार रावडे यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून  रेशन दुकानाचा तात्पुरता परवाना  रद्द करण्यात आला 

 शिवनगी येथील  यांच्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात रेशनधारकांना शासनाने दिलेल्या साठ्यापेक्षा कमी धान्य देण्यात येत होते. आलेल्या धान्याची व वाटप धान्याची नोंद ठेवली जात नव्हती. भाव फलकावर भाव लिहिले जात नव्हते, स्टॉक पत्रक भरले जात नव्हते आणि आलेल्या रेशनकार्ड धारकांशी उद्धट बोलले जात असल्याच्या  तक्रारी तालुका पुरवठा विभाग व तहसीलदार यांच्याकडे आल्या होत्या. सर्व चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली असून पुढील आदेश होईपर्यंत सद्यस्थितीत ते दुकान जवळच्या दुकानाला जोडले असून विनातक्रार वाटप करण्यास सांगितले आहे. त्यानुसार मंडलाधिकारी, पुरवठा अधिकारी तलाठी आणि तहसीलदार यांनी या ठिकाणी भेटी देऊन संबंधित दुकानदारांची कानउघाडणी केली होती; मात्र त्यात बदल होत नसल्याने या  दुकानदारांचा तात्पुरता परवाना रद्द करण्यात आला आहे. पुढील कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यानंतर या दुकानावर मोठी कारवाई केली जाणार आहे.

-----------------------

"करोना विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांना गावागावातील सीमा बंद केल्या आहेत त्यामुळे अनेक गरजू व गरिबांना धान्य मिळत नाही शिवाय त्यांचा रोजगार बंद आहे अशा नागरिकांना काही दानशूर व्यक्‍ती संस्था आणि संघटनांकडून धान्य उपलब्ध करून देण्यासाठी  प्रांताधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी धडपड  सुरू  आहे. याबरोरबच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गावपातळीवर धान्य बॅंक सुरू करून दानशूर व संस्थांकडून मिळालेली धान्य व मदत गावातील गरजू, गरीब नागरिकांना देण्यात यावी. प्रत्येकाने आपल्यातील सद्‌सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मदत करावी, असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.

Pages