सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाजातील ऊसतोड कामगारांना आर्थिक तात्काळ मदत जाहीर करावी:-शिवबुध्दचे संदिपराजे मुटकुळे - Pantnagari Times

Breaking News

Saturday, April 25, 2020

सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाजातील ऊसतोड कामगारांना आर्थिक तात्काळ मदत जाहीर करावी:-शिवबुध्दचे संदिपराजे मुटकुळे


प्रतिनिधी / पंढरपूर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला,करमाळा,दक्षिण सोलापूर या भागातील ऊसतोड मजुर हातमंजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.परंतू आज पडीला कोरोनाने संपूर्ण विश्वाला विकाख्या घातला आहे.त्यांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केल्यापासून सध्या ऊसतोड कामगारांना आर्थिक तात्काळ मदत जाहीर करावी .लाॅकडाऊनमध्ये  मोठ्याप्रमाणात नुसकान होत आहे.ऊसतोड मजूरांचा उदरनिर्वाह करणाचे साधन ठप्प झाले आहे. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या थोडाफार पैसाही आजामितीला संपलेला आहे.परंतू 20एप्रिल नंतर लाॅकडाऊनच्या नियामात शिथिलता दिली असलीतरी पुन्हा मंजुरीसाठी कामधंदा बंद असल्यामुळे ऊसतोड मजूर बांधवमोठ्या संकटात सापडले आहेत.म्हणून या अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक समाजातील मंजूरांचा ऊसतोड पारंपारागत व्यवसाय बंद असल्याने त्यानंतर ते गावाकडे आल्यावर ऊसतोड मजूर मोलमंजूरी करून तो आपल्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहान करून पोट भरतो. लाॅकडाऊन काळात झालेल्या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांना  किमान 15हजार आर्थिक तात्काळ  मदत कुटूंब प्रमुखांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.असे निवेदनाव्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.आपण जर मदत जाहीर नाही केलतर सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाजातील ऊसतोड मजुरांना कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.असे मत शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी व्यक्त केली आहे.

Pages